अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए)
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) ही ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणारी प्रमुख संस्था असून महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखाली येते. ग्राहकांना उत्तम दर्जाची औषधे, सौंदर्य प्रसाधने व सुरक्षित अन्न पदार्थ मिळण्यासाठी त्यासंबंधी असलेल्या अधिनियमांची अंमलबजावणी या प्रशासनामार्फत करण्यात येते.
अन्न व औषध प्रशासनाचे मुख्य कार्यालय वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व) मुंबई येथे असून विभागीय व जिल्हा पातळीवर कार्यालये आहेत. आयुक्त हे प्रशासनाचे प्रमुख असून ते अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत अन्न सुरक्षा आयुक्त म्हणून सुध्दा अधिसूचित आहेत.अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) यांची वेबसाईट खालीलप्रमाणे आहे :
http://fda.maharashtra.gov.in/

अन्न विषयक आणि औषध विषयक कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनामध्ये खालील स्वतंत्र विभाग आहेत. त्याबाबत माहिती खालील प्रमाणे आहे.
- औषध विभाग
- अन्न विभाग
- औषध व अन्न नियंत्रण प्रयोगशाळा.
- औषध विभाग :
- औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम १९४० व त्याअंतर्गत नियम १९४५.
- औषधे व जादुटोणादि उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियम १९५४.
- जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत पारीत औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३.
- नारकोटिक ड्रग्स आणि सायक्रोटॉपिक सबस्टनसेस अधिनियम १९८५.
- विषारी द्रव्ये कायदा १९१९ व त्याखालील नियम आणि महाराष्ट्र विषारी द्रव्ये नियम १९७६.
औषधांचा वापर हा मानवी जीवन सुसह्र होण्यासाठी असून ग्राहकांना उत्तम दर्जाची औषधे मिळणे, तसेच त्यांना गुणवत्तापूर्ण सौंदर्य प्रसाधने मिळणे यासाठी असलेल्या अधिनियमांची अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य अन्न व औषध प्रशासनावर सोपविण्यात आले आहे. या प्रशासनाद्वारे औषध विषयक खालील अधिनियमांची अंमलबजावणी करण्यात येते.
या वरील सर्व अधिनियमाच् / नियमांची / आदेशाच्ं राज्यात अम्ंलबजावणी करून जनतेचे आरोग्य सुस्थितीत राखण्यासाठी खालील प्रकारची यंत्रणा निर्माण करण्यात आलेली आहे.
राज्यस्तरीय :– आयुक्त-सह आयुक्त-सहायक आयुक्त -औषध निरिक्षक
विभागस्तरीय : – सहआयक्त-सहायक आयक्त-आष्ध निरिक्ष्क
जिल्हास्तरीय :– सहायक आयुक्त-औषध निरिक्षक
तसेच राज्यातील अंमलबजावणी करणाया यत्र्ंणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि राज्यातील अंमलबजावणी प्रभावशाली करण्यासाठी राज्यस्तरावर सह आयुक्त (दक्षता) यांच्या नियंत्रणांत गुप्तवार्ता विभाग कार्यरत आहे.
गुप्तवार्ता विभागाची संरचना खालील प्रमाणे आहे.
सहआयुक्त (दक्षता) :– सहायक आयुक्त (गुप्तवार्ता)-औषध निरिक्षक (गुप्तवार्ता) मुख्यालय – विभागीय औषध निरिक्षक (गुप्तवार्ता)
वरील यंत्रणेच्या माध्यमातुन खालील प्रकारची कर्तव्ये प्रशासनाकडून बजावण्यात येतात.