लेखा व दक्षता शाखा कामकाज:
-
शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, आयुर्वेदिक रुग्णालये, अन्न व औषध प्रशासन यांचे लेखाविषयक तपासणी करणे, निरीक्षण अहवाल तयार करुन तो संबंधित कार्यासनांना/ कार्यालयांना पाठविणे व त्यावर कार्यवाही होईल या दृष्टीने पाठपुरावा करणे.
-
लोकलेखा समिती, अंदाज समिती व भारताचे लेखानियंत्रक इत्यादी अहवालातील लेखा आक्षेप व इतर लेखा विषयक बाबींचा पाठपुरावा व समन्वंय साधणे.
-
विभागातील शासकीय/अशासकीय सर्व लेख्यांच्या नोंदी ठेवणे.
-
विनियोजन लेख्या संदर्भात महालेखापाल कार्यालयाने उपस्थित केलेल्या आक्षेपासंदर्भात संबंधित संस्थांना कळवून त्यांच्याकडून अनुपालन प्राप्त करुन घेवून महालेखापाल कार्यालयाकडे संमतीसाठी (तपासणी) पाठवणे.
|