प्रस्तावना
1. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची निर्मिती दिनांक 1 सप्टेंबर 1982 रोजी करण्यात आली. सचिव हे ह्रा विभागाचे प्रमुख आहेत. ह्रा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची मंजूर पदे, त्यांची विगतवारी व वेतनश्रेणी, त्यांचा तपशील सोबतच्या विवरणपत्रात दर्शविला आहे.
2. ह्रा विभागाचे खाली नमूद केलेली संचालनालये / विभाग प्रमुख यांच्यावर सर्वंकष प्रशासकीय नियंत्रण आहे : -
(1) वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई.
(2) आयुष संचालनालय, मुंबई.
(3) अन्न व औषध प्रशासन मुंबई.
तसेच ह्रा विभागाच्या अधिपत्याखाली खाली नमूद केलेल्या स्वायत्त संस्था कार्यरत आहेत : -
(1) हाफकीन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, मुंबई.
(2) हाफकीन जीव औषध निर्माण, महामंडळ मर्यादित, मुंबई.
(3) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक.
(4) महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे.
3. वर नमूद केलेली संचालनालये/संस्था याचे कार्य थोडक्यात पुढील प्रमाणे आहे : -
(1) वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय :
राज्यातील शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय व त्यांना संलग्न असलेली रुग्णालये यांचे संचालन व नियंत्रण हे संचालनालय करते. खाजगी, वैद्यकीय महाविद्यालयावरही नियंत्रण ह्रा संचालनालयाचे आहे. विद्याथ्र्यांना आरोग्य विज्ञानाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी सामायिक परीक्षा घेऊन विद्याथ्र्यांना प्रवेश देणे हे ही महत्वपूर्ण कार्य हे संचालनालय करते.
(2) आयुष संचालनालय :
आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी चिकित्सा पध्दतीने शिक्षण देण्यासाठी ह्रा स्वतंत्र संचालनालयाची स्थापना करण्यात आली आहे. ह्रा चिकित्सा पध्दतींचे शिक्षण देणाया महाविद्यालयांना संलग्न असलेल्या रुग्णालयामध्ये रुग्णांवर औषधोपचार केले जातात.
(3) अन्न व औषध प्रशासन :
औषधे व सौंदर्य प्रसाधने यांच्या निर्मितीवर ह्रा यंत्रणेचे नियंत्रण आहे. औषध व अन्न पदार्थांमधील भेसळीस प्रतिबंध करणे हे अन्न व औषध प्रशासनाचे महत्वपूर्ण कार्य आहे संबंधित अधिनियम/नियम याची अम्ं ालबजावणी करणे ही या यंत्रणेची जबाबदारी आहे. अन्न व औषध प्रशासनाची महाराष्ट्रतील सर्व जिल्ह्रांमध्ये कार्यालये असून सह आयुक्त/ सहाय्यक आयुक्त या दर्जाचा अधिकारी हा जिल्हा कार्यालयांचे नियंत्रण करीत असतो.
(4) महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था :
ही स्वतंत्र संस्था सन 1990-91 या वर्षी स्थापन करण्यात आली असून त्याचा उद्देश जनतेला मानसिक आरोग्याच्या संदर्भात प्रशिक्षण व आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे असा आहे.
(5) हाफकीन संस्था व हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ :
हाफकीन संस्थेमध्ये औषधे व सौंदर्य प्रसाधने, मद्य इत्यादींचे संदर्भात प्रशिक्षण संशोधन व चाचणी करण्याचे काम केले जाते. तर हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ काही औषधे, लशी, द्रव्ये इत्यादीची निर्मिती करते.
(6) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ :
आरोग्य विज्ञान विषयक आभ्यासक्रमासाठी, स्वतंत्रपणे कार्य करण्यासाठी ह्रा विद्यापीठाची स्थापना नाशिक येथे सन 1998 मध्ये करण्यात आली. हे विद्यापीठ विविध वैद्यकीय पध्दतीचे शिक्षण देणाया विविध महाविद्यालयांना संलग्न करुन घेणे, त्यांची नोंदणी करणे व महाविद्यालयामध्ये शिकविल्या जाणाया अभ्यासक्रमांना मान्यता देणे ही कार्ये करते. त्याच बरोबर विविध विद्याशाखांच्या परिक्षा घेणे व पदवी प्रदान करणे हे विद्यापिठाचे मुलभूत कार्य आहे.
(7) वैद्यकीय परिषदा :
ह्रा विभागाच्या नियंत्रणणाखाली विविध अधिनियमअनुसार गठीत करण्यात आलेल्या खालील परिषदा कार्यरत आहेत.
(1) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल.
(2) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल.
(3) महाराष्ट्र होमिओपॅथी कौन्सिल.
(4) महाराष्ट्र फार्मसी कौन्सिल.
(5) महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडीसीन.
(6) महाराष्ट्र डेंटल कौन्सिल.
(7) महाराष्ट्र ओ. टी./पी. टी. कौन्सिल.
(8) महाराष्ट्र पॅरा-मेडीकल कौन्सिल.
(9) महाराष्ट्र अक्युपंक्चर (सूचीछिद्रोपाय) कौन्सिल.
वरील वैद्यकीय परिषदासंबंधित वैद्यकीय पध्दतीशी संबंधीत अधिनियमांची अंमलबजावणी करणे व संबंधित नियमांनुसार नोंदणी देणे ही कामे करतात.