आरोग्य विज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या बदलांची योग्य ती सांगड घालून वैद्यकीय शिक्षण व रुग्णसेवेच्या गुणात्मक वाढीवर लक्ष केंद्रीत करणे आणि यासाठी वैद्यकीय आणि पॅरा वैद्यकीय क्षेत्रांसाठी वेळोवेळी प्रभावी नियमनांची आखणी व अंमलबजावणी.
विशेषज्ञ व अतिविशेषज्ञ डॉक्टरांची तसेच रुग्णसेवेशी संबंधित तांत्रिक मनुष्यबळाची लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करणे
वैद्यकीय व्यवसायासाठी सुनिश्चित करण्यात आलेल्या नीती मूल्यांच्या काटेकोर पालनासाठी नियंत्रण व प्रोत्साहन
वाजवी किमतीत जीवरक्षक औषधांची पुरेशी उपलब्धता, भेसळमुक्त अन्न व आधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे.