परिचय
महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद ही महाराष्ट्र शासनाने गठीत केलेली स्वायत्त संस्था
आहे. सदरहू परिषदेचे कामकाज हे औषध व्यवसाय अधिनियम, 1948 व महाराष्ट्र शासनाने घटित
केलेल्या महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद नियम, 1969 नुसार चालते. महाराष्ट्र राज्य
औषध व्यवसाय परिषद ही दिनांक 01.09.1964 रोजी अस्तित्वात आली. त्यापूर्वी बॉम्बे स्टेट
फार्मसी ट्रिब्युनल व बॉम्बे स्टेट फार्मसी कौन्सिल हे अस्तित्वात होते. सध्या महाराष्ट्र
राज्य औषध व्यवसाय परिषदेचे कार्यालय हे मुलुंड, मुंबई, येथे आहे.
पत्ता व संपर्क तपशील
राज्य कामगार विमा योजना रुग्णालय आवार, लाल बहादूर शास्त्री मार्ग,
मुलुंड (पश्चिम), मुंबई-400 080
दूरध्वनी क्र. 25684291/25684418
ईमेल: mspcindia@gmail.com
कार्य व उद्दिष्ट
उद्दिष्ट
औषध व्यवसाय अधिनियम, 1948 मध्ये दिलेल्या कारणांनुसार व माहराष्ट्र राज्य औषध व्यवसाय
परिषद नियम, 1969 नुसार महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद ही राज्यात औषध विषयक पेशा
व व्यवसाय यांचे विनियमन करणारी व फार्मासिस्टचा व्यवसायिक दर्जा वृध्दिंगत करणारी
स्वायत्त संस्था आहे.
कार्य
- औषध व्यवसाय अधिनियम, 1948 च्या कलम 32(2) अंतर्गत तरतूदींची पूर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांना
पंजीकरण देणे व पंजीकरण दाखला प्रदान करणे हे या परिषदेचे प्रमुख कार्य आहे.
- राज्यातील नोंदणीकृत फार्मासिस्टची नोंदवही अद्यावत ठेवणे.
- औषध व्यवसाय अधिनियम, 1948 च्या कलम 42 अंतर्गत फार्मासिस्ट म्हणून नोंदणी न झालेल्या
व्यक्तीने औषध देण्यासंदर्भातील कलमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यात फार्मसी निरीक्षकांची
नियुक्ती करणे.
- रजिस्टर्ड फार्मासिस्टकडून व्यावसायिक गैरवर्तन झाल्यास औषध व्यवसाय अधिनियम, 1948
च्या कलम 36 अंतर्गत त्याचे नाव नोंदवहीतून काढण्याचे अधिकार परिषदेस आहेत. त्यासंदर्भातील
कार्यवाही परिषद नियमानुसार करणे.
- औषध व्यवसाय अधिनियम, 1948 व महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद नियम, 1969 नुसार
मतदार यादी तयार करणे व महाराष्ट्र शासनाच्या मदतीने व मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र
राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या निवडणूकीची कार्यवाही करणे.
- तद्अनुषंगिक इतर कार्ये.
संकेतस्थळाचा तपशील
www.mspcindia.org