महाराष्ट्र राज्य दंत परिषद

परिचय

महाराष्ट्र राज्य दंत परिषद ही बॉम्बे गर्व्हमेंट नोटीफिकेशन क्र. 2338/33, दिनांक 21.09.1951 नुसार अस्तित्वात आली असून ती “एक निगम निकाय” (A Body Corporate) आहे.

पत्ता व संपर्क तपशील

निबंधक, महाराष्ट्र राज्य दंत परिषद, मुंबई यांचे कार्यालय,

विस्तारित कार्यालय
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय,
तिसरा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाऊंड,
छ.शि. टर्मिनस जवळ, मुंबई-400001.

प्रशासकीय कार्यालय
ब्लॉक नं. 211, आनंद कॉम्प्लेक्स,
दुसरा मजला, 189-साने गुरुजी मार्ग,
आर्थर रोड नाका, चिंचपोकळी पश्चिम, मुंबई-400011.
दूरध्वनी क्र. 022 22617644
फॅक्स क्र. 022 22617634
इमेल: msdcmumbai@gmail.com

कार्य व उद्दिष्ट

  • दंतवैद्य अधिनियम, 1948 अन्वये, मुंबई दंत नियम, 1951 तसेच दंतवैद्य (आचारनीती) (महाराष्ट्र) नियम, 1965 नुसार विहित केलेल्या नियमानुसार कामकाज चालते.
  • दंतवैद्य अधिनियम, 1948 च्या कलम 31, 37 व 38 अन्वये अनुक्रमे दंतवैद्यक, दंत आरोग्य रक्षक व दंत कारागीर यांची नोंदवही परिषदेकडून तयार केली जाते.
  • दंत व्यावसायिकांचे अधिनियमातील तरतूदीनुसार नोंदणी घेणे, नुतणीकरण करणे, तक्रार अर्जाचा निपटारा नियमांनुसार लावणे, न्यायालीयन प्रकरणे तसेच इतर कामकाज पार पाडले जाते.

संकेतस्थळाचा तपशील

www.msdcmumbai.org.in