महाराष्ट्र वैद्यकीय परिषद

परिचय

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद ही स्वायत्त संस्था असून महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय विक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखाली असून ही संस्था बॉम्ब मेडिकल कौन्सिल ॲक्ट सन 1912 नुसार प्रथमत: अस्तित्वात आली. या परिषदेचे कार्यक्षेत्र पूर्वी महाराष्ट्र व गुजरात या द्विभाषिक राज्यात होते. या राज्याच्या द्विभाजनानंतर या परिषदेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यापुरते आहे. तद्नंतर उपरोक्त अधिनियमात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या. सद्याची परिषद ही महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, 1965 व महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नियम, 1967 नुसार कार्यरत आहे.

पत्ता व संपर्क तपशील

प्रबंधक, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, मुंबई,
189/अे, आनंद कॉम्प्लेक्स, पहिला मजला, साने गुरुजी मार्ग,
आर्थर रोड नाका, चिंचपोकळी पश्चिम, मुंबई-400011.
दूरध्वनी क्र. 022 23010668/ 23072464

कार्य व उद्दिष्ट

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे मुख्य कार्य आधुनिक औषधी पध्दतीमधील वैद्यकीय पदविधारकांना नोंदण देणे व त्यांच्या नोंदणीचे दर 5 वर्षांनी नुतनीकरण करणे, तसेच परिषदेकडे नोंदणी असलेल्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायींवर नियंत्रण ठेवणे असे आहे. यासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने आचारसंहिता विहित केली आहे. या आचारसंहितेच वैद्यकीय व्यवसायींकडून पालन होते किंवा कसे हे पाहणे ही परिषदेची जबाबदरी असल्यामुळे त्या अनुषंगाने वैद्यकीय व्यवसायी विरुध्द या परिषदेकडे अनेक तक्रारी प्राप्त होतात.

भारतीय आयुर्विज्ञान परिषद अधिनियम, 1956 व महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, 1965 चे कलम 22 अंतर्गत या परिषदेला समन्यायीक अधिकार प्राप्त आहेत. तसेच, वैद्यकीय व्यवसायी विरुध्दच्या तक्रारींची चौकशी करण्याप्रकरणी दिवाणी न्यायालयात प्रकरणे चालविण्यासाठी विहित केलेली पध्दती (Civil Procedure Code) या परिषदेला लागू करण्यात आलेली आहे.

संकेतस्थळाचा तपशील

www.maharashtramedicalcouncil.in