महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी

परिचय

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, 235 पेनिनसुला हाऊस, 3रा मजला, डॉ. दादाभाई नौरोजी रोड, फोर्ट, मुंबई-1 ही संस्था वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अंतर्गत स्थापन झालेली स्वायत्त संस्था आहे. या परिषदेतर्फे महाराष्ट्रातील व इतर राज्यातील होमिओपॅथी अर्हता धारण करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी व नुतनीकरणाचे काम महाराष्ट्रातील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयातील आंतरवासिय विद्यार्थींना तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र देणे, नाव बदल, पत्ता बदल, अतिरिक्त अर्हता नोंदणी, पडताळणी, ना-हरकत प्रमाणपत्र व इतर कामे केली जातात.

परिषदेचा पत्ता:

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी,
235 पेनिनसुला हाऊस,3रा मजला,
दादाभाई नौरोजी मार्ग, फोर्ट, मुंबई-400 001.

परिषदेचे अधिकार, कर्तव्ये व कार्य पुढीलप्रमाणे:

 • वैद्यक व्यवसायी नोंदणी करण्याची व्यवस्था करणे आणि नोंदवहीत नोंदी ठेवणे.
 • प्रबंधकांच्या कोणत्याही निर्णयावर करण्यात आलेली अपिलांची सुनावणी करणे आणि त्याबाबत निर्णय देणे.
 • नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीस ताकीद देणे अथवा त्योच नाव नोंदवहीतून तात्पुरते काढून टाकणे किंवा कायमचे काढून टाकणे अथवा त्याच्याविरुध्द परिषदेच्या मते आवश्यक किंवा इष्ट असेल अशी इतर शिस्तभंगाची कारवाई करणे.
 • परीक्षा घेणे, अशा परीक्षांसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करणे आणि त्यासाठी फी आकारणे
 • परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी प्रशिक्षणाचे पाठ्यक्रम चालविणे.
 • पदव्या, पदविका आणि सन्मानचिन्हे प्रदान करणे.
 • विद्यावेतने, शिष्यवृत्या, पदके, पारितोषिके आणि इतर बक्षिसे देणे.
 • परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या पाठ्यक्रमाचे प्रशिक्षण देण्याच्या प्रयोजनाकरिता परिसंस्थांना मान्यता देण्याची शिफारस करणे किंवा अशी मान्यता रद्द करण्याची शिफारस करणे.
 • पाठ्यपुस्तके तयार करणे, प्रसिध्द करणे आणि विहित करणे आणि (केंद्रीय परिषदेने विहित केलेल्या पाठ्यक्रमांची पत्रके) प्रसिध्द करणे.
 • होमिओपॅथीक व्यवसायासाठी आवश्यक त्या प्राविण्याचा योग्य तो दर्जा राखण्याबाबत तरतूद करणे.
 • ग्रंथालये स्थापन करणे व ती सुस्थितीत ठेवणे.
 • होमिओपॅथी व बायोकेमिस्ट्रि या विषयांच्या पदव्युत्तर प्रशिक्षण विषयक व संशोधन विषयक योजनांची शिफारस करणे व त्यास उत्तेजन देणे.
 • मान्यताप्राप्त परिसंस्थांचा अथवा कोणत्याही अर्हतेसाठी शिक्षण देणाऱ्या कोणत्याही इतर परिसंस्थांच्या तपासणीसाठी तरतूद करणे आणि आवश्यक असेल अशी माहिती देण्याविषयी अशा परिसंस्थांना फर्मावणे.
 • अभ्यास मंडळाची (बोर्ड ऑफ स्टडीज) व समित्यांची नेमणूक करणे. अशा अभ्यास मंडळामध्ये किंवा समित्यांमध्ये परिषदेचा सदस्य असलेल्या किंवा नसलेल्या व्यक्तींचाही समावेश असेल. मात्र, अशा व्यक्तींपैकी किमान निम्म्या व्यक्ती या वैद्यक व्यवसायींच्या नोंदवहीत ज्यांच्या नावाची नोंद झालेली आहे अशा वैद्यक व्यवसायी व्यक्ती असतील. तसेच अशा मंडळाची किंवा समित्यांची रचना, कर्तव्ये व कार्ये यासाठी विनियम तयार करणे.
 • रात्य शासनाच्या मान्य्तेच्या अधीन राहून, देणग्या स्वीकारणे आणि त्या स्वीकारण्याच्या शर्ती निर्धारित करणे.
 • या अधिनियमात नेमून दिलेले असतील अशा किंवा नियमाद्वारे किंवा विनियमाद्वारे किंवा उपविधीद्वारे विहित करण्यात येतील अशा इतर अधिकारांचा वापर करणे आणि अशी इतर कर्तव्ये व कार्ये पार पाडणे.

परिषदेची वेबसाईट: www.mchmumbai.org

परिषदेचा मेल: mail@mchmumbai.org

परिषदेचा दूरध्वनी क्र. 22704400, 22703086