Right to Service

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, 2015

क्र.संकीर्ण .615/प्र.क्र.59/अधिनियम - महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, 2015 (सन 2015 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.5 ) च्या कलम 3 च्या पोटकलम (1) अन्वये प्रदान केलेल्या शक्तिचा वापर करत वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग, याद्वारे, त्याची दुय्यम कार्यालये व प्राधिकरणे अर्थात व वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई, आयुष संचालनालय, मुंबई, महाराष्ट्र मानसिक आरोगय संस्था, पुणे आणि अन्न व औषध प्रशासन आयुक्तालय, मुंबई यांच्या पात्र व्यक्तिंना पुरविण्यात येणाऱ्या लोकसेवा, त्या पुरविण्यासाठी नियत कालमर्यादा पदनिर्देशित अधिकारी आणि प्रथम व द्वितीय अपील प्राधिकारी, यासोबत जोडलेल्या अनुक्रमे परिशिष्ट १,२,३ व ४ मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे या अध्यादेशाच्या प्रयोजनांसाठी अधिसूचित करीत आहे.

परिशिष्ट-1

(वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय व त्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये यांच्या मार्फत पात्र व्यक्तिंना पुरविण्यात येणाऱ्या लोकसेवा)

अ.क्र.
(1)
लोकसेवा
(2)
नियत कालमर्यादा
(3)
पदनिर्देशित अधिकारी
(4)
प्रथम अपील प्राधिकारी
(5)
द्वितीय अपील प्राधिकारी
(6)
1. विकलांगता प्रमाणपत्र देणे 30 दिवस वैद्यकीय अधीक्षक अधिष्ठाता सह-संचालक
2. किरकोळ जखम याचे प्रमाणपत्र देणे 20 दिवस वैद्यकीय अधीक्षक अधिष्ठाता सह-संचालक
3. कार्यमुक्त प्रमाणपत्र देणे 15 दिवस घटक प्रभारी अधिष्ठाता सह-संचालक
4. चारित्र्य प्रमाणपत्र देणे 30 दिवस उप-अधिष्ठाता अधिष्ठाता सह-संचालक
5. अभ्यास प्रमाणपत्र देणे 30 दिवस उप-अधिष्ठाता अधिष्ठाता सह-संचालक
6. ना देय प्रमाणपत्र देणे 30 दिवस उप-अधिष्ठाता अधिष्ठाता सह-संचालक
7. ना हरकत प्रमाणपत्र देणे 30 दिवस उप-अधिष्ठाता अधिष्ठाता सह-संचालक
8. नवप्रविष्टांना वैद्यकीय प्रमाणपत्र देणे 15 दिवस वैद्यकीय अधीक्षक अधिष्ठाता सह-संचालक

परिशिष्ट-2

(आयुष संचालनालय व तयाखालील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालये व रुग्णालये यांच्या मार्फत पात्र व्यक्तिंना पुरविण्यात येणाऱ्या लोकसेवा)

अ.क्र.
(1)
लोकसेवा
(2)
नियत कालमर्यादा
(3)
पदनिर्देशित अधिकारी
(4)
प्रथम अपील प्राधिकारी
(5)
द्वितीय अपील प्राधिकारी
(6)
1. किरकोळ जखम याचे प्रमाणपत्र देणे पाच दिवस निवासी वैद्यकीय अधीकारी अधिष्ठाता संचालक
2. कार्यमुक्त प्रमाणपत्र देणे दोन दिवस निवासी वैद्यकीय अधीकारी अधिष्ठाता संचालक
3. चारित्र्य प्रमाणपत्र देणे पाच दिवस घटक प्रभारी अधिष्ठाता संचालक
4. अभ्यास प्रमाणपत्र देणे पाच दिवस प्रशासन अधिकारी अधिष्ठाता संचालक
5. ना देय प्रमाणपत्र देणे 15 दिवस प्रशासन अधिकारी अधिष्ठाता संचालक
6. ना हरकत प्रमाणपत्र देणे 30 दिवस प्रशासन अधिकारी अधिष्ठाता संचालक
7. वैद्यकीय प्रमाणपत्र देणे 15 दिवस प्रशासन अधिकारी अधिष्ठाता संचालक

परिशिष्ट-3

(महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे, च्या मार्फत पात्र व्यक्तिंना पुरविण्यात येणाऱ्या लोकसेवा)

अ.क्र.
(1)
लोकसेवा
(2)
नियत कालमर्यादा
(3)
पदनिर्देशित अधिकारी
(4)
प्रथम अपील प्राधिकारी
(5)
द्वितीय अपील प्राधिकारी
(6)
1. अनुभव प्रमाणपत्र देणे 15 दिवस मुख्य प्रशासकीय अधीकारी मनोविकृतिचिकित्सक वर्ग-1 संचालक प्राध्यापक
2. ना देय प्रमाणपत्र देणे 30 दिवस मुख्य प्रशासकीय अधीकारी मनोविकृतिचिकित्सक वर्ग-1 संचालक प्राध्यापक
3. ना हरकत प्रमाणपत्र देणे 30 दिवस मुख्य प्रशासकीय अधीकारी मनोविकृतिचिकित्सक वर्ग-1 संचालक प्राध्यापक
4. उत्तीर्ण प्रमाणपत्र देणे 30 दिवस मुख्य प्रशासकीय अधीकारी मनोविकृतिचिकित्सक वर्ग-1 संचालक प्राध्यापक
5. अंतर्वासिता प्रमाणपत्र देणे 30 दिवस मुख्य प्रशासकीय अधीकारी मनोविकृतिचिकित्सक वर्ग-1 संचालक प्राध्यापक
6. वास्तविक विद्यार्थी प्रमाणपत्र 30 दिवस मुख्य प्रशासकीय अधीकारी मनोविकृतिचिकित्सक वर्ग-1 संचालक प्राध्यापक

परिशिष्ट-४

(अन्न व औषध प्रशासन आयुक्तालय, मुंबई, च्या मार्फत पात्र व्यक्तिंना पुरविण्यात येणाऱ्या लोकसेवा)

अ.क्र.
(1)
लोकसेवा
(2)
नियत कालमर्यादा (3) पदनिर्देशित अधिकारी (4) प्रथम अपील प्राधिकारी (5) द्वितीय अपील प्राधिकारी (6)
1. अन्न व्यवसायींची अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 व त्याखालील नियम यांच्या अनुसार नोंदणी करणे 21 दिवस अन्न सुरक्षा अधीकारी सहआयुक्त (अन्न) संचालक प्राध्यापक
2. अन्न व्यवसायींची अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 व त्याखालील नियम यांच्या अनुसार वस्तुनिर्माण व विक्री यासाठी अनुज्ञाप्ती देणे. 45 दिवस सहायक आयुक्त (अन्न्‍) सहआयुक्त (अन्न) संचालक प्राध्यापक
3. औषध व सौदंर्य प्रसाधने अधिनियम,1940 व त्याखालील नियम यांच्या अनुसार वस्तुनिर्माण व विक्री यासाठी अनुज्ञाप्ती देणे. 30 दिवस सहायक आयुक्त (औषध) सहआयुक्त (अन्न) संचालक प्राध्यापक
4. औषध व सौदंर्य प्रसाधने अधिनियम,1940 व त्याखालील नियम यांच्या अनुसार घाऊक विक्री औषधिभांडार यासाठी अनुज्ञाप्ती देणे. 30 दिवस सहायक आयुक्त (औषध) सहआयुक्त (अन्न) संचालक प्राध्यापक