मागे

नागरिकांची सनद

अ. क्र. पुरविण्यात आलेल्या सेवेचे नांव लागणा-या कागदपत्रांची यादी सेवा पुरविण्यात येणारा कालावधी जबाबदार अधिकारी नियंत्रण अधिकारी
1 अन्न परवाना व नोंदणी 1.मालक/भागीदार/अधिकृत व्यक्ती यांच्या सहीने पूर्ण भरलेला दोन प्रतीतील फॉर्म बी.
2.प्रक्रिया केंद्राची निलप्रत व नकाशा यामध्ये प्रत्येक प्रक्रिया प्रभागानुसार आखून दिलेल्या जागेचे क्षेत्र (परिमाण) मीटर/स्क्वेअर मीटरमध्ये.
3.संचालकांची यादी पूर्ण पत्ता व संपर्कासाठीचा तपशिल.
4.यंत्र व साधनसामुग्रीचे नांव त्यांची यादी ज्यामध्ये त्यांची संख्या व प्रतिष्ठापीत क्षमता आणि वापरण्यास येणाऱ्या विद्युत अश्वशक्तीचा तपशिल.
5.मालक/भागीदार/संचालक/अनधिकृत व्यक्ती यांना सरकारी प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले छायाचित्रयुक्त्‍ा ओळखपत्र व अधिनिवासाचा पुरावा.
6.उत्पादन करू इच्छिणाऱ्या अन्न पदार्थाचा (वर्गवारी) असलेली यादी (उत्पादकासाठी).
7.उत्पादकाने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला दिलेले प्राधिकृत पत्र ज्यामध्ये नामनिर्देशित व्यक्तीचे नांव व पत्ता असेल, त्या शिवाय जबाबदार पर्यायी व्यक्तीचे नांव व पत्ता व त्याला दिलेले अधिकार याचा उल्लेखासहीत, जो अन्न सुरक्षा अधिकाऱ्याला तपासणीच्या वेळी, अन्न नमुना घेतेवेळी पॅकिंग करतेवेळी, पाठवितेवेळी सहाय्य करेल. 8. घटक म्हणून वापरात येणाऱ्या पाण्याचा विश्लेषण अहवाल (रासायनिक व जिवाणू सहीत) जो मान्यताप्राप्त प्रयोगशाळेमार्फत तपासावा व ज्यामध्ये अशा प्रयोगशाळेतील त्या प्रतिनिधीचे नांव ज्यांनी हा नमुना विश्लेषणास घेतला आणि तो नमुना घेतल्याची तारीख याचा उल्लेख असावा.
9.जागेचा अधिकृत कब्जा असल्यासंदर्भातील पुरावा. (विक्री करारनामा, भाडे करारनामा, विद्युत बील ई.)
10.भागीदार पत्राची प्रत/शपथपत्र / संस्थेची घटना प्रत.
11.सहकारी संस्थेसाठी सहकारी कायदा 1861/बहुराज्य सहकारी कायदा 2002 अंतर्गत प्राप्त प्रमाण पत्राची प्रत.
12.पुनर्वेष्ठ्न करणाऱ्यासाठी उत्पादकाचे “ना हरकत प्रमाणपत्र
13.अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली अथवा प्रमाणपत्र (असल्यास)
14.दुध व दुग्धजन्य् पदार्थ प्रक्रियाकर्त्यांसाठी दुधाचे उगमस्थान, दूध संकलनाचे ठिकाण अथवा दुध संकलन योजना व नियोजन पध्दती
15.मांस व मांस प्रक्रिया करणाऱ्यांसाठी कच्च्या अन्न पदार्थांचे उगमस्थान.
16.बाटलीबंद पिण्याचे पाणी उत्पादक/बाटलीबंद खनिजयुक्त पाण्याचे उत्पादक/किंवा कार्बोदकयुक्त जलपेय उत्पादकांसाठी पाण्याचा विश्लेषण अहवाल जो किटकनाशकाच्या अवशेषासाठी केलेला असावा व तो सार्वजनिक प्रयोगशाळे अथवा मानांकित प्रयोशाळेकडून प्राप्त्‍ा करावा. तसेच नमुना संकलित करणाऱ्या व्यक्तीचे नांव, दिनांक व नमुन्याचा उगम लिहिलेला व प्रक्रिया शाखेचे नांव त्यावर असणे अनिवार्य आहे.
17.अन्न पदार्थांचे वितरण केलेल्या अन्न व्यवसायिकांसाठी, आवश्य्क असेल त्या नुसार अन्न पदार्थ परत बोलावण्याची प्रणाली/पध्द्त
18.अन्न व्यवसायासाठी महानगरपालिका अथवा स्थानिक प्राधिकरण व प्रदूषण नियंत्रण कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र, औद्योगिक प्रभाग म्हणून अधिसूचित केली नसलेल्या साठीच केवळ सदरची नियमन लागू होण्यापूर्वी इतर कायद्यांतर्गत दिल्या गेलेल्या परवान्याच्या नुतनीकरण अथवा हस्तांतरण बदलासाठी लागणाऱ्या कागदपत्राचा तपशिल.
अन्न परवाना 30 दिवस
अन्न परवाना नोंदणी 60 दिवस
सहाय्यक आयुक्त अन्न
अन्न सुरक्षा अधिकारी
आयुक्त
2 किरकोळ औषध विक्री व घाऊक औषध विक्री परवाना 1. शुल्क भरल्याची पावती किंवा चलन
2.अर्ज नमुना क्रमांक 19,19अ
3. घटनेबाबत कागदपत्रे MOU तसेच मालक,भागीदार, संचालक, ट्रस्टिंची नावे व पत्ता
4. जागेची कायदेशीर कागदपत्रे-भाडेपावती /करपावती इ.
5.नाहरकत प्रमाणपत्र
6.विजबिल
7.जागेचा नकाश्याची प्रत
8.शितपेटीची पावती
9.रजि. फार्मासिस्ट यांची नेमणूक व स्विक़ृती पत्र
10.रजिस्टेशन दाखला व पीपीपी कार्ड
11.घाऊक विक्रेत्या करीता सक्षम तांत्रिक इसमाकरीता रजिस्टर फार्मासिस्ट यांची नेमणूक व स्विक़ृती पत्र/शैक्षणिक प्रमाणपत्र
30 दिवस सह आयुक्त औषध आयुक्त