मागे

तक्रार निराकरण पध्दत

अ.क्र. तपशील विवरण
1. तक्रार कोठे करावयाची अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तालयात ग्राहक संरक्षण व तक्रार निवारणासाठी स्वतंत्र कक्ष आहे तेथे टोल फ्री क्रमांक 1800222365 वर तक्रार नोंदविता येते. तसेच तक्रार संबंधित विभागीय/ जिल्हा निहाय अधिकारी यांचेकडे दूरध्वनी क्रमांक तसेच ईमेल आयडीवर व फॅक्सव्दारे तक्रार नोंदविता येते.
2. तक्रारीची पोच तक्रारीची पोच दिली जाते.
3. तक्रारीची कार्यवाही तक्रार संबंधित विभागास / कार्यालयास पाठवून आवश्यकतेनूसार त्याची तपासणी / चौकशी करुन कार्यवाही घेतली जाते व तक्रारदारास कळविण्यांत येते.
4. तक्रारीचे निराकरण तक्रारीच्या स्वरुपावरुन तक्रारीचे विभागीय कार्यालयास माहिती देवून आवश्यकतेनूसार चौकशी / तपास करण्यांत येतो.
5. तक्रार निवारण्यासाठी लागणारा कालावधी त्वरीत निवारण करण्यांत येते. तक्रार निवारण करण्यासाठी कालावधी 15 दिवस.
6. तक्रार निवारण करणा-या अधिका-याचे नांव संपर्क व तप‍‍शिल प्रत्येक कार्यालयाचे प्रमुख हे तक्रार निवारण अधिकारी असतील व त्यांची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

याच उपक्रमाचा भाग म्हणून डॉक्टरांतर्फे देण्यात येणा-या प्रिश्क्रीपशन मध्ये सुसुत्रता राहावी व ते कायदयातील तरतुदींना धरुन असावी याची नितांत आवश्यकता असल्याचे लक्षात आले. अश्या प्रिश्क्रीपशनचे प्रारुपाचा नमुना तयार करण्याकरीता आयुक्त अन्न आणि औषध प्रशासना महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 24.7.2013 रोजी एका समितीची स्थापना करण्यात आली. सदर समितीमध्ये अन्न्‍व औष्ध प्रशासन महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, महाराष्ट्र व्हेटिरनरी कौन्सिल महाराष्ट्र डेंन्टल कौन्सिल, द इंडियन फार्मास्य्ुटिकल असोशिएश्न, इंडियन मेडिकल असोशिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मे‍डिकल असोशिएशन (महाराष्ट्र शाखा) महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे प्रतिनिधी यांचा समावेश होता.

दिर्घ चर्चेअंती सर्वसंमतीने औषधांचे प्रिश्क्रीपशनचे प्रारुपाचा आदर्श नमुना तयार करण्यात आला असुन सर्व संबंधितांना वैज्ञानिक रित्या अनिवार्य प्रिश्क्रीपशन प्रारुप म्हणून लागू करण्यात येत असुन ते सर्व संबंधितांना वितरीत करण्यात आले आहे.