मागे

उद्दिष्ट्ये/कर्तव्ये

 • सुरक्षित व आरोग्यदायी अन्न पदार्थ उपलब्ध करुन देणे.
 • अन्न व्यावसायिकांसाठी अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीचा वापर करणे.
 • सर्व अन्न व्यवसायांसाठी परवाना अथवा नोंदणी

अंमलबजावणी करणारे कायदे / नियम व नियंत्रणे

 • अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006
 • अन्न सुरक्षा व मानके नियम 2011
 • अन्न सुरक्षा व मानके नियम (कॉन्टॅमिनंन्ट, टॉक्झीन्स आणि रेसिडन्स) नियमन 2011
 • अन्न सुरक्षा व मानके नियम (फुड प्रॉडक्ट स्टॅण्डर्ड ॲण्ड फुड ॲक्टीव्हीटीज ) नियमन 2011
 • अन्न सुरक्षा व मानके नियम (लॅबोरेटरी व सॅम्पल ॲनालिसिस ) नियमन 2011
 • अन्न सुरक्षा व मानके नियम (अन्न व्यावसायिकांसाठी परवाने व नोंदणी) नियमन 2011
 • अन्न सुरक्षा व मानके नियम (पॅकेजिंग ॲण्ड लेबलिंग ) नियमन 2011
 • अन्न सुरक्षा व मानके नियम (प्रोहिबिशन ॲण्ड रिस्ट्रीक्शन ऑन सेल्स ) नियमन 2011

औषध विभाग

उदिदष्टे

 • सुरक्षित शुध्द प्रभावी व गुणवत्ता दर्जाची औषधे उपलब्ध करणे.
 • ग्राहकांना स्वमतानुसार औषध घेण्यापासून परावRत्त करणे.
 • चांगल्या दर्जाची औषधे माफक दरात उपलब्ध करणे.
 • औषधाचे योग्य साठवणूक करणेबाबत जनजागRती करणे.
 • बाजारातून बंदी व इरेशनल औषधी पाठ काढून टाकणे.
 • औषध संदर्भात विविध धोरण ठरविणे.

कर्तव्ये

 • औषध संदर्भात विविध धोरण ठरविणे.
 • औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्या अंतर्गत नियम 1945.
 • औषधे व जादुटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954
 • नारकोटिक व सायकोट्रॉपीक सबस्टन्सेस कायदा 1985 त्या अंतर्गत नियम.
 • अत्यावश्यक वस्तु कायदा 1954 अंतर्गत औषधे किंमत नियंत्रण आदेश 2013
 • विषारी द्रव्ये कायदा 1919
 • सिगारेट व तंबाखुजन्य पदार्थ कायदा 2003

उपरोक्त कायदे हे जनस्वास्थाशी निगडीत आहेत व या कायदयांची अंमलबजावणी करणे हे प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे.

प्रशासनाची प्रमुख कर्तव्ये पुढीलप्रमाणे आहेत

 1. औषधे व सौंदर्य प्रसाधने निर्मिती संस्थाना अनुज्ञप्ती देणे व अनुज्ञप्ती नुतनीकरण करणे. तसेच औषधे व विक्री संस्थाना अनुज्ञप्ती देणे व अनुज्ञप्ती नुतनीकरण करणे.
  • ॲलोपेथीक औषध उत्पादन परवाना/अनुज्ञप्ती
  • सौंदर्य प्रसाधने उत्पादन परवाना /अनुज्ञप्ती
  • औषधे रिपॅकींग अनुज्ञप्ती
  • रक्तपेढी अनुज्ञप्ती
  • आयुर्वेदिक, सिध्द युनानी औषध उत्पादन अनुज्ञप्ती
  • होमियोपेथीक औषधे उत्पादन अनुज्ञप्ती
 2. औषधी चाचणी प्रयोगशाळांना मान्यता देणे.
 3. औषध निर्मात्यांच्या औषधी घटक द्रव्यास व औषधी पाठास मान्यता देणे.
 4. औषध निर्याती व निविदाकाराने विविध दाखले प्रदान करणे.
 5. औषधांचा दर्जा व गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे.
 6. अनुज्ञप्ती देण्यापूर्वी व दिल्यानंतर संस्थाची तपासणी.
 7. कायद्यांच्या अंमलबजावणी संदर्भात प्रशासकीय कार्यवाही.
 8. औषध व सौंदर्य प्रसाधने चाचणी व विश्लेषणासाठी नमूने घेणे.