मागे

प्रस्तावना

अन्न व औषध प्रशासन ही वैद्यकिय शिक्षण व औषधी दव्ये विभाग, मंत्रालय यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणारी यंत्रणा आहे. अन्न व औषध प्रशासनाची सुरुवात दिनांक 15 मे, 1947 रोजी ड्र्ग कंट्रोल अडमिस्ट्रेशन या नावाने झाली.

या प्रशासनाकडे 07.04.1970 पासून अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्या 1954 च्या अंमलबजावणीसाठी देण्यात आला आहे व तेव्हापासून प्रशासनाचे नांव अन्न व औषध प्रशासन असे करण्यात आले. तत्पूर्वी अन्न भेसळ प्रतिबंधक कायदयाची अंमलबजावणी काही ठराविक महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रामध्ये होत होती. त्यानंतर मात्र अन्न व औषध प्रशासनाकडे हे काम दिल्यानंतर तालुका, जिल्हा व गामिण विभागात अन्न भेसळ तिबंधक कायद्याची अंमलबजाणी या प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली. द्विस्तरीय अंमलबजावणी नको म्हणून त्यानंतर महाराष्ट्र शासनाने हळूहळू विविध नगरपालीकांकडील कामे अन्न व औषध प्रशासनाकडे सोपविली. माञ 5 ऑगस्ट 2011 पासून अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 निरसित होऊन अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006, नियम व नियमन 2011 ची अंमलबजावणी राज्यात अन्न व औषध प्रशासनामार्फत केली जाते.

या प्रशासनाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्रात काही जिल्हयाच्या ठिकाणी सर्कल कार्यालये होती आणि त्याचे पमुख सहायक आयुक्त हे होते. संबंधीत सर्कल कार्यालयाच्या अधिपत्याखालील जिल्हयांमध्ये औषध निरीक्षकाची कार्यालय होती. सन 1975 पासून सर्व जिल्हयाच्या ठिकाणी प्रशासनाद्वारे सहायक आयुक्तंची कार्यालये स्थापना करण्यांत येऊन त्या त्या विभागातील जिल्हयाच्या या प्रशासनाच्या कार्यालयांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याचे काम विभागीय सह आयुक्तांकडे सोपविण्यात आले.