मागे

मिशन

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय हे मुलत: वैद्यकीय/दंत शिक्षण देणे आणि या शैक्षणिक कार्याबरोबरच वैद्यकीय महाविद्यालयाच्या संलग्नित रुग्णालयांमधुन प्राथमिक व विशेषोपचार आरोग्य सेवा पुरविते. संचालनालयाकडून (1) वैद्यकीय शिक्षण (2) दंत-वैद्यकीय शिक्षण (3) परिचारिका शिक्षण (4) निम-वैद्यकीय शिक्षण इत्यादी दिले जाते.

वैद्यकीय शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य हे देशातील एक प्रगत राज्य् असून ॲलोपॅथी, आयुर्वेद, दंत चिकित्सा, होमिओपॅथी व युनानी या विद्याशाखामध्ये शिक्षण दिले जाते या सर्व विद्याशाखेत एकूण 350 महाविद्यालये उपलब्ध असून ही महाविद्यालये शासकीय निम-शासकीय, खाजगी अनुदानित-विनाअनुदानित आणि अभिमत विद्यापिठे या क्षेत्रातील आहे. या महाविद्यालयातून वरील विद्याशाखांमधून सर्व विशेषोपचार आणि अतिविशेषोपचार विषयक शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.

  • हदयरोग चिकित्सा
  • हदय शल्य चिकित्सा
  • मूत्ररोग चिकित्सा
  • मज्जातंतू चिकित्सा/मज्जातंतूशल्य चिकित्सा
  • बालरोग शल्य चिकित्सा
  • सुघटनशल्य (प्लॅस्टिक सर्जरी ) चिकित्सा
  • जठररोग चिकित्सा (गॅस्ट्रो एन्रॉलॉजी ) तसेच इतर वैद्यकीय, अतिविशेषोपचार सेवा