मागे

प्रस्तावना

दि.1 मे,1970 पासून स्वतंत्ररित्या हे संचालनालय अस्तित्वात आले आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय व त्यांना संलग्न असलेली रुग्णालये यांचे संचालन व नियंत्रण हे संचालनालय करते. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयावरही नियंत्रण हया संचालनालयाकडून केले जाते आहे. विद्यार्थ्यांना आरोग्य विज्ञानाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी सामायिक परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देणे हे ही महत्व्‍पुर्ण कार्य हे संचालनालय करीत आहे.

डॉ.प्रविण हरिश्चंद्र शिनगारे हे वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई संचालनालयाचे संचालक आणि विभागप्रमुख म्हणून आहेत.

संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई या संचालनालयाचा पत्याचा व संपर्काचा तपशील खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.

संपुर्ण पत्ता:

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण संशोधन, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय इमारत,
4 था मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, पी डिमेलो रोड, फोर्ट, मुंबई 400 001.
दूरध्वनी क्रमांक:- 91-22-22620361-65
फॅक्स क्रमांक:- 91-22-22620562/22652168
ई-मेल:- dmercetll@gmail.com
संकेत स्थळ:- http:/www.dmer.org