मागे

कार्य व उद्देश

कार्य

 • आयूष संचालनालयातील व उपकार्यालयातील गट अ, ब व क संवर्गातील अध्यापक, अधिकारी व अध्यापकेतर कर्मचारी यांच्या सेवाविषयक व वेतनविषयक बाबी हाताळणे.
 • आयूष संचालनालयातील गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक व वेतनविषयक बाबी हाताळणे.
 • आयूष संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासन अनुदानित खाजगी आयूर्वेद व युनानी संस्थांमधील अध्यापक व अध्यापकेतर कर्मचारी यांच्या सेवाविषयक व वेतनविषयक बाबी हाताळणे.
 • नवीन आयुर्वेदीक / युनानी/होमिोपॅथीक महाविद्यालये सुरु करणे/ पदवी अभ्यासक्रम प्रवेश क्षमता वाढ करणे इत्यादी अनुषंगाने संबंधित संस्थांचे सक्षमता तपासणी (तांत्रिक निरीक्षण) करुन अहवाल राज्य शासनास सादर करणे.
 • नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करणे/ क्षमता वाढ करणे इत्यादी इत्यादी अनुषंगाने संबंधित संस्थांचे सक्षमता तपासणी (तांत्रिक निरीक्षण) करुन अहवाल राज्य शासनास सादर करणे.
 • खाजगी आयुर्वेदीक/युनानी औषधे निर्माण करणाऱ्या कंपन्या/ व्यक्ती यांनी पाठविलेल्या औषधांच्या चिकित्सालयीन चाचण्यांबाबत कार्यवाही करणे.
 • आयुर्वेदिक व यूनानी क्षेत्रात काम करणाऱ्या नागरी संस्थांना केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या केंद्रिय अनुदान मंजुरीबाबतच्या प्रस्तावावर कार्यवाही करणे.
 • नवीन निसर्गोपचार व योगोपचार महाविद्यालय सुरु करणे इत्यादी अनुषंगाने संबंधित संस्थांचे सक्षमता तपासणी (तांत्रिक निरीक्षण) करुन अहवाल राज्य शासनास सादर करणे.
 • आयुष संचालनालय व या कार्यालयाच्या अधिपत्याखालील उपकार्यालयांचे व शासन अनुदानित खाजगी आयुर्वेद व युनानी महाविद्यालयांचे वेतन व वेतनेतर बाबींचा अर्थसंकल्प तयार करणे व शासनास सादर करणे तसेच शासनाकडून प्राप्त अनुदानाचा स्विकार व योग्य वितरण करणे.
 • आयुष संचालनालय व या कार्यालयाच्या अधिपत्याखालील उपकार्यालयांचे व शासन अनुदानित खाजगी आयुर्वेद व युनानी महाविद्यालयांचे लेखापरीक्षण करणे.
 • आयुष संचालनालय व या कार्यालयाच्या अधिपत्याखालील उपकार्यालयांशी व शासन अनुदानित खाजगी आयुर्वेद व युनानी महाविद्यालयांशी संबंधित न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.
 • उद्देश

  1. अस्तित्वात असलेल्या आयुष शिक्षण संस्थांचे श्रेणीवर्धन करुन त्यांची सक्षमता वृध्दी करणे.
  2. राज्यातील प्रत्येक महसूल विभागात किमान एक शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय स्थापन करणे.
  3. राज्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात आयुष आरोग्य सेवा केंद्र सहस्थापित करणे.
  4. राज्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात, जिल्हा रुग्णालयात आयुष आरोग्य सेवा केंद्र सहस्थापित करणे.
  5. प्राधान्याने स्वतंत्र पदव्युत्तर संस्थेशी संबंधित दोन अद्यावत (State of art) उच्च स्तरीय शिफारस दर्जाची (tertiary referral level) आयूष "अनुसंधान व शिफारस / referral रुग्णालये" स्थापित करणे.
  6. आयुष चिकीत्सा पध्दतींना प्राधान्य असणाऱ्या क्षेत्रात विशेष चिकीत्सा केंद्र स्थापित करणे.
   • वार्धक्यजन्य रोगांसाठी उपचार केंद्र.
   • जीवनशैलीजन्य रोगांसाठी उपचार केंद्र.
   • असाध्य रोगावस्थेतील रुग्णांसाठी उपचार केंद्र.
   • त्वचा रोगांसाठी उपचार केंद्र.
   • यकृत व पित्ताशयजन्य रोगांसाठी उपचार केंद्र.
  7. वनौषधींच्या संवर्धनासाठी व शाश्वत उपयोगासाठी कार्यदल स्थापित करणे.
  8. आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथीक औषधांच्या उत्पादनासाठी व दर्जा नियंत्रणासाठी पायाभूत सुविधा समुह स्थापित करणे.
  9. आयुर्वेद, सिध्द व युनानी वनौषधींच्या व औषधी कल्पांचे विपणन व निर्यात करणे.
  10. अस्तित्वात असलेल्या आय. पी. आर. प्रणालीचे उपयोजन करणे.
  11. राज्य स्तरावर व आयुष संस्थांच्या स्तरावर "अनुसंधान नियंत्रण प्रणाली" स्थापित करणे.