मागे

प्रस्तावना (कार्यालय व उपकार्यालयांची संक्षिप्त माहीती)

 • महाराष्ट्र शासनाने 1957 साली आयूर्वेद संचालनालयाची स्थापना केली, तत्पूर्वी 1954 ते 1957 या कालावधीत अस्तित्वात असलेले हे कार्यालय तत्कालीन सर्जन जनरल, मुंबई यांच्या अधिपत्याखाली होते. 1975 साली होमिओपॅथी चिकीत्सा पध्दतीला या संचालनालयाच्या छत्राखाली घेण्यात आले. वर्तमानकाली राज्यातील समस्त भारतीय चिकीत्सा पध्दती उदा. आयूर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिध्द व होमिओपॅथी (आयूष) या आयूर्वेद संचालनालय , वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र राज्य या कार्यालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. आता या संचालनालयाचे नाव बदलून आयूष संचालनालय करण्यात आलेले आहे.
 • प्राध्यापक कुलदीप राज कोहली, हे महाराष्ट्र राज्याचे आयूष संचालक आहेत.
 • आयूष संचालनालयाच्या पत्त्याचा व संपर्काचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
  • संपुर्ण पत्ता: शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय इमारत, ४ था मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, पी. डीमेलो रोड, फोर्ट, मुंबई 400 001.
  • दुरध्वनी क्रमांक: +9122-22622247
  • फॅक्स क्रमांक: +9122-22626007
  • ई-मेल: dir.ayush-mah@gov.in
  • संकेतस्थळ: www.mahayush.gov.in
 • आयूष संचालनालयाच्या अधिपत्याखाली १४ उपकार्यालये कार्यरत आहेत-
  अ क्र उपकार्यालयाचे नाव
  1. सहाय्यक संचालक आयूर्वेद, नवी मुंबई.
  2. सहाय्यक संचालक आयूर्वेद, पुणे.
  3. सहाय्यक संचालक आयूर्वेद, नागपूर.
  4. रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय (आयू.), डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई
  5. म. आ. पोदार आयूर्वेद रुग्णालय, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई
  6. शासकीय आयूर्वेद महाविद्यालय, राजे रघुजी नगर, सक्करदरा चौक, नागपूर
  7. शासकीय आयूर्वेद रुग्णालय, राजे रघुजी नगर, सक्करदरा चौक, नागपूर
  8. शासकीय आयूर्वेद महाविद्यालय, वझीराबाद, नांदेड
  9. शासकीय आयूर्वेद रुग्णालय, वझीराबाद, नांदेड
  10. शासकीय आयूर्वेद महाविद्यालय, मधुबन तुळजापूर रोड, उस्मानाबाद
  11. शासकीय आयूर्वेद रुग्णालय, मधुबन तुळजापूर रोड, उस्मानाबाद
  12. शासकीय होमिओपॅथीक रुग्णालय, विलेपार्ले (पूर्व), मुंबई.
  13. 20 रुग्ण शय्यांचा आयूर्वेद कक्ष, ससून जनरल हॉस्पीटल, पुणे
  14. शासकीय आयूर्वेद, युनानी रसशाळा व औषधी प्रयोगशाळा, नांदेड
 • संबंधित सहाय्यक संचालक आयूर्वेद यांच्या अधिपत्याखाली १६ आयूर्वेद व ३ युनानी शासन अनुदानित खाजगी महाविद्यालये कार्यरत आहेत.