मागे

प्रस्तावना

1. आधुनिक वैद्यक पध्दती यामध्ये यथायोग्य समन्वय आणि पध्दतशीर शिक्षण, अध्यापन, प्रशिक्षण व संशोधन होत आहे हे सुनिश्चत करण्याच्या प्रयोजनाकरीता एका स्वतंत्र विदयापीठाची स्थापना करणे आणि राज्यात वैद्यक शास्‍त्रात समतोल विकास साधणे, तसेच वैद्यक शाखांतील विविध अभ्यासक्रमात एकरुपता आणणे आणि त्याच्याशी संबंधित बाबींसाठी तरतूद करणे.

2. महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना १० जून १९९८ रोजी झाली.

3. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपर्णू महाराष्ट्र आहे.

ध्येय

 1. आरोग्य विज्ञानाच्या शिक्षणात उत्कृष्ट शैक्षणिक वातावरणाची निर्मिती करुन, सर्व विषयात नैपूण्य आणि लवचिक आंतरविदयाशाखीय प्रशिक्षण आणि संशोधन, आधुनिक आरोग्याच्या क्षेत्रात नाविण्यपूर्ण तंत्र आत्मसात केलेले दर्जेदार आणि नीतिमुल्ये जोपासणारे कुशल मनुष्यबळाची निमिर्ती करुन, समाजाची गरज ओळखून वैदयकीय सुविधा पुरविणारे मनुष्यबळ निर्माण करणारी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त विदयापीठ म्हणून नावलौकिक मिळविणे.
 2. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रामाणिक व कार्यक्षम प्रशासन देवून सर्व घटकांच्या समाधानास प्राप्त होईल अशा सेवा देणारी संस्था म्हणून नावारुपास आणणे.

दूरदृष्टी

अध्यापन, संशोधन, विस्तार व सेवा यांद्वारे ज्ञान व बुध्दिमत्ता यांचा प्रसार, निर्मिती व जपवणूक करणे व परिणामकारक प्रात्यक्षिकांद्वारे आणि आपल्या सामुहिक जीवनाद्वारे समाजजीवनावर प्रभाव पाडणे ही आधुनिक वैदयक पध्दती यामध्ये यथायोग्य समन्वय आणि पध्दतशीर शिक्षण, अध्यापन, प्रशिक्षण व संशोधन होत आहे हे सुनिश्चत करण्याच्या प्रयोजनाकरीता एका स्वतंञ विदयापीठाची स्थापना करणे आणि राज्यात वैदयक शास्‍त्रात समतोल विकास साधणे, तसेच वैदयक शाखांतील विविध अभ्यासक्रमात एकरुपता आणणे आणि त्याच्याशी संबंधित बाबींसाठी तरतूद करणे.

कार्य व उदिष्टये

 1. ज्ञानाची निमिर्ती, जपणूक व प्रसार करण्याची आपली जबाबदारी पार पाडणे
 2. शिस्त आणि बौध्‍दिक जिज्ञासा यात वाढ करणे आणि सर्वोच्च गुणवत्ता साध्य करण्याच्या अविरत कार्यास एक निर्भय शैक्षणिक संस्था म्हणून वाहून घेणे.
 3. सहिष्णुता व परस्पर सामंज्याच्या वातावरणात एकविधता व बहुविधता यांस प्रोत्साहन देणे.
 4. भारताचे संविधान यामध्ये नमूद केलेले स्वातंत्र, निधर्मवाद, समता व सामाजिक न्याय यांचा प्रसार करणे व सर्वोत्तम मूलतत्त्वे व मूल्ये यांची राष्ट्रीय विकासाच्या दृष्टीने जोपासना करुन सामाजिक –आर्थिक परिर्वतनामध्ये प्ररेक शक्ती म्हणून कार्य करणे.
 5. विदयापीठाने स्थानिक व प्रादेशिक विकासाच्या समस्यांमध्ये जवळून सहभागी होवून ज्ञान व कौशल्ये यांचा लाभ व्यक्तिविकासासाठी व समाजविकासासाठी उपलब्ध करुन देणे.
 6. एक सजग व वस्तुनिष्ठ समीक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडणे, व्यक्ती व्यक्तींमधील प्रज्ञेचा शोध घेवून तिची जोपासना करणे, जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये योगय नेतृत्व तयार करणे व योग्य दृष्टिकोन, आवडी व मूल्ये विकसीत करण्याच्या कामी नवीन पिढीला सहाय्य करणे.
 7. सर्वाना आरोग्यविज्ञान विषयक शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करुन देणे
 8. कार्यक्षम व संवेदनशील प्रशासन, शास्त्रशुध्द व्यवस्थापन यांची तरतूद करणे व अध्यापन व संशोधन संघटनांचा विकास करणे
 9. वेगान विकास व परिवर्तन होणाऱ्या समाजात ज्ञान संपादनास चालना देणे व बुध्दिजीवी समाजाला योग्य अशी, आधुनिक प्रसारमाध्यमे व तंत्रज्ञान यांच्या साहाय्याने उच्‍च शिक्षणाचे जाळे निर्माण करुन मानवी कर्तृत्वाच्या सर्व क्षेत्रांमधील नवनवीन कल्पना, संशोधन व शोध यांच्या संदर्भात विदया, प्रशिक्षण व कौशल्य यांचा दर्जा वाढविण्याच्या संधी सातत्याने उपलब्ध करुन देणे
 10. विदयार्थ्यांशी संबंधित असलेल्या सर्व विदयाविषयक व इतर संबंधित बाबींच्या संबंधात एकमेव मार्गदर्शक निकष म्हणून स्पर्धात्मक गुणवत्ता व श्रेष्ठत्व वाढीस लावण्याचे प्रयत्न करणे
 11. प्रत्येक व्यक्तीचे शारिरीक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्य साध्य करण्यासाठी शिक्षण व प्रशिक्षण देणे
 12. आतंरज्ञानशाखा अभ्यास व संशोधनामार्फत निरनिराळया वैदयकीय पध्दतीमध्ये अधिक सलोखा निर्माण करणे
 13. निरोगी व्यक्तीचे आरोग्य कायम राखण्यासाठी व रुग्ण व्यक्तीचा रोग बरा करण्यासाठी भारतीय वैदयकपध्दती सुरु करणे व विकसीत करणे

कार्यालयीन संरचना

पुरस्कार/ सन्मान

 • विदयापीठास आय.एस.ओ ९००१: २००८ टीयुव्ही नॉर्ड संस्थेकडून दि. ०८‍ एप्रिल २०१४ रोजी प्राप्त झाले.