मागे

प्रस्तावना

Dr. Waldemar Mordecai Haffkineवाल्देमार मोर्डेकाय हाफकिन यांचा जन्म 15 मार्च 1860 रोजी ओदेसा या रशिया मधील प्रांतात झाला. डॉ.अॅलेक मेटकिनकॉफ आणि डॉ.लुईस पाश्चर यांच्या विख्यात शिष्यत्वातील डॉ.हाफकिन 1892 मध्ये कॉलराची साथ हाताळण्यासाठीचे विशेष कार्य हाती घेऊन भारतात आले. त्यांनी विशेष लशींमधील उपचार पद्धतींचा अवलंब करुन प्राणघातक रोगांचा प्रसार होऊ नये म्हणून यशस्वीरित्या लढा दिला.

1896 मध्ये प्लेगचा उद्रेक झाल्यानंतर, प्लेग संशोधन प्रयोगशाळेची उभारणीसाठी मुंबई येथे पाचारण करण्यात आले. डॉ.हाफकिन यांनी शोधून काढलेल्या प्लेग प्रतिबंधक लस ही इतकी परिणामकारक ठरली की त्यावेळी या काळ्या रोगावर त्यांनी एकहाती विजय मिळविला असे म्हंटले जाऊ लागले.

जीवरक्षक लसी व औषधे यांना वाढत असलेली मागणी व उत्पादन प्रक्रियेसाठी करावा लागणारा विस्तार लक्षात घेता, 1975 साली हाफकिन या संस्थेचे विभाजन करुन औषधे निर्मितीसाठी कारखाना अधिनियम 1956 अंतर्गत पूर्णपणे महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत उपक्रम असलेले हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ मर्यादित याची स्थापना केली. 1977 साली गोळ्या, कैपस्युल्स्, मलम इ. करिता हाफकिन अजिंठा, जळगाव या नावाने उपकंपनी स्थापन केली गेली.

औषध निर्माण क्षेत्रातील मानव सेवेस समर्पित हे ब्रीदवाक्य असलेले हाफकिन महामंडळ जैविक व अजैविक, विशेषकरुन अणुजीव लस निर्मिती, प्रतिविष व रक्तजल निर्मिती व औषध उत्पादन व पुरठा करण्यात अग्रेसर आहे.

मौखिक पोलिओ लसींचा मुबलक पुरवठा करुन भारत सरकारच्या पोलिओ निर्मूलन व जागतिक लसीकरण मोहिमेत हाफकिन महामंडळाने बहुमोल असे योगदान दिलेले आहे.

युनिसेफसाठी mOPV1, bOPV(1&2) tOPV या पोलिओ लसींचा पुरवठा करण्यास आवश्यक असेलेली पूर्वअर्हता WHO-GMP हाफकिन महामंडळास प्राप्त आहे. उत्पादित केलेली औषधांचा पुरवठा माफक किंमतीत, वेळेवर व मुबलकरित्या हाफकिन महामंडळकडून नेहमीच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांना करण्यात येतो.

ध्येय

"मानव सेवेस समर्पित"

दृष्टिकोन

  • दर्जेदार जीवरक्षक लसी, प्रतिविष यांचे उत्पादन
  • आधुनिक उत्पादन प्रणाली व GMP प्रमाणकानुसार सतत दर्जा संवर्धन
  • दर्जेदार उत्पादनांची निर्मिती व श्रेणी संवर्धन
  • कर्मचा-यांचे मनोधैर्य व कर्तव्यनिष्ठेत वाढीसाठी प्रयत्न
  • महामंडळाच्या व्यापार व उत्पादनांचे स्वबळावर संवर्धन करणे
  • सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत गुंतवणुकीवर नफा मिळवित रहाणे

काही उल्लेखनिय कार्ये

  • जीवरक्षक औषंधांच्या उत्पादन व विक्रीत लक्षणीय वाढ
  • भारत सरकार व युनिसेफच्या सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत महत्त्वाचे योगदान
  • महाराष्ट्र शासनाच्या सर्व आरोग्य विभागांना, संस्थाना व रुग्णालयांना वेळेवर, माफक दरात व आवश्यकता-मागणीनुसार जीवरक्षक औषधांचा पुरवठा.
  • संयुक्त राष्ट्र (जागतिक आरोग्य संघटना) मानकानुसार पोलिओ (mOPV1, bOPV(1&2) tOPV ) लस उत्पादन