मागे

परिचय

हाफकिन संस्था 1974 साली, 1860 च्या संस्था नोंदणी कायद्यानुसार संशोधन संस्था म्हणुन नोंदणीकृत झाली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाची अनुदानित संस्था आहे.

हाफकिन संस्था 1974 साली, 1860 च्या संस्था नोंदणी कायद्यानुसार संशोधन संस्था म्हणुन नोंदणीकृत झाली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाची अनुदानित संस्था आहे. 1975 च्या दरम्यान या संस्थेस सार्वजनिक न्याय स्वरुप (Public Trust) प्राप्त झाले. हाफकिन संस्थेचे उद्देश हे “Memorandum of Association of the Institute” मध्ये नमूद केलेले आहेत. हे उद्देश खालील तीन व्यापक क्षेत्रात लक्ष केंद्रीत करते. ते तीन क्षेत्र खालीलप्रमाणे आहेत.

 • प्रशिक्षण
 • संशोधन
 • चाचणी

ही संस्था नियामक परिषदेद्वारे (Governing Council) संचालित होते व संशोधन सल्लागार परिषद (Research Advisory Council) आणि शैक्षणिक सल्लागार परिषद (Academic Advisory Council) या दोन परिषदांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे.

मिशन आणि दृष्टी

हाफकिन संस्थेचे मुख्य्‍ा Mission and Vision हे मानव तसेच प्राणी यांच्यामधील संसर्गजन्य रोगांसंदर्भात अभ्यास करणे, तपास करणे, तसेच त्या रोगांसंदर्भात प्रतिबंधात्मक उपाय शोधून काढणे व वरील नमुद क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण (किंवा मार्गदर्शन) प्रदान करणे असे आहे.

कार्य आणि उद्दीष्टे

हाफकिन संस्थेचे कार्य आणि उद्दीष्टे खालीलप्रमाणे आहेत.

 • मानवी जीवनाच्या उध्दारासाठी व त्यांना जगण्यासाठी अत्यावश्वक व अवघड असणाऱ्या वेगवेगळया वैद्यकिय व त्याला अनुसरुन असलेल्या विज्ञानामध्ये संशोधन करणे.
 • रोगांचे निदान करण्यासाठी “Clinical” नमुन्यांचे परिक्षण करणे.
 • संरक्षक औषधांच्या संशोधन विकासासाठी व औषध निर्माण करण्यासाठी तत्सम संस्थासोबत "Collaborative" काम करणे.
 • शासकीय तसेच तत्सम संबधित अधिका-यांना सुक्ष्म्‍जंतूशास्त्रासंबंधी तसेच संसर्गजन्य रोगांचे निदान व त्या रोगांसंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविणे.
 • औषधांची चाचणी करणे तसेच त्या क्षेत्रात सल्लागार, Chemist आणि Pharmacologist म्हणुन काम करणे.
 • महाराष्ट्र राज्यशासनातर्फे तपासणीसाठी प्राप्त होणा-या आम्ल पदार्थांचे तसेच इतर “Excised” औषधांचे विश्लेषण करणे.

संघटनात्मक तक्ता

संघटनात्मक तक्ता

पुरस्कार आणि कामगिरी

 • हाफकिन संस्था ISO 9001:2008 प्रमाणित संस्था आहे.
 • वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान विभाग, विज्ञान व औद्योगिकी मंत्रालय द्वारे हाफकिन संस्थाही “वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान” (SIRO) संस्था म्हणून संबोधली जाते.
 • जागतिक आरोग्य संघटना (WHO) द्वारे हाफकिन संस्था ही राष्ट्रीय Influenza केंद्र म्हणून ओळखली जाते.
 • राष्ट्रीय संसर्गजन्य रोगनिदान केंद्र एकात्मिक साथीचे रोग प्रकल्पाअंतर्गत हाफकिन संस्थेची विषाणुशास्त्र विभागाची प्रयोगशाळा ही एकमेकांशी जोडलेल्या सर्व राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये काम करते.
 • हाफकिन संस्थेतील रसायनचाचणी विभाग हे अन्न व औषध प्रशासन मान्यता प्राप्त (FDA Approved) प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्राप्त झालेले मद्यार्कद्रव्ये, भारतीय बनावटीची विदेशी दारु (IMFL) व रासायनिक द्रव्ये (Denaturants) यांचे विश्लेषण केले जाते.