अ.क्र. |
कार्यासन |
अधिकारी |
विषय |
1. |
आस्थापना |
अवर सचिव/ कक्ष अधिकारी |
- वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग खुद्द (अंतर्गत)
- सर्व संवर्गाच्या आस्थापना व सेवाविषयक बाबी.
- ब) प्रशासकीय, व्यवस्थापकीय व जनसंपर्क बाबी.
- क) विविध अग्रीमांचे वाटप, खर्चाचा ताळमेळ घालणे.
- नोंदणी, निंदणी, रोखशाखा, टंकलेखन शाखा यांचे कार्यावर नियंत्रण ठेवणे.
- ज्येष्ठता याद्या, सेवाप्रवेश नियम, पदांची मानके.
|
2. |
रोखशाखा |
अवर सचिव/ कक्ष अधिकारी |
- विभागातील सर्व अधिकारी/ कर्मचारी यांची सर्व प्रकारची देयके तयार करणे व त्यांचे प्रदान करणे.
- अधिकारी/कर्मचारी यांची सेवा पुस्तके अद्यावत ठेवणे.
- चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाहनिधीचे हिशोब ठेवणे.
- विभागाच्या (खुद्द) आस्थापनेबाबत अर्थसंकल्प/ सुधारित अंदाज तयार करण्यासाठी माहिती पुरवणे.
- मृत्यु-नि-सेवानिवृत्ती उपदान, भविष्य निर्वाह निधी, गटविमा योजना इ. प्रकारची नामनिर्देशने स्वीकृत करणे आणि सेवा पुस्तकात नोंद घेणे.
- स्वग्राम घोषित करणे व त्याची सेवापुस्तकात नोंद घेणे.
- रोख शाखेशी संबंधित खर्चमेळाचे काम.
|
3. |
नोंदणीशाखा |
अवर सचिव/ कक्ष अधिकारी |
- मंत्रालयीन प्रशासकीय विभागातून विभागात येणाऱ्या व विभागातून मंत्रालयीन प्रशासकीय विभागाना पाठविण्यात येणाऱ्या नस्त्या/ संदर्भांची नोंद संगणकामार्फत घेवून नोंदी ठेवणे तसेच विभागात येणारे संदर्भ/ प्रकरणे याची आवक जावक नोंद करणे, नोंदी ठेवणे.
- टपाल तिकीटाचा हिशोब नोंदवही ठेवणे.
- मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या संदर्भाची नोंदवही व इतर नोंदवह्या ठेवणे.
- विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या कामाचे वाटप व त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे.
- गोपनीय टपाल व नस्त्या स्वीकारणे, निर्गमित करणे व त्याचे वाटप करणे.
- कार्यासनानी निर्गमित केलेल्या पत्राची नोंद घेवून विभागातील संबंधित कार्यासने, मंत्रालयीन विभाग यांना पाठविणे तसचे मंत्रालयाच्या आसपासच्या कार्यालयांना पत्राची पोच करणे.
- विभागाची वितरण सूची अद्यावत ठेवणे.
- शासन निर्णय, परिपत्रके निर्गमित करुन विभागप्रमुखाना पाठविणे.
- झेरॉक्स मशीन चालक व फ्रॅकींग मशीन चालकावर देखरेख ठेवणे.
- संगणकीय साहित्य पुरविणे.
- अन्य विभागाशी संबंध असतानाही विभागाला उद्देशून लिहिलेले संदर्भ किंवा अनावश्यकपणे/ निर्हेतुकपणे विभागाला पृष्ठांकित केलेले संदर्भ.
|
4. |
आयुर्वेद-1 |
अवर सचिव/ कक्ष अधिकारी |
- शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालये व रुग्णालये तसेच शासकीय होमिओपॅथी रुग्णालय येथील सर्व संवर्गातील अधिकारी/ कर्मचारी यांच्या सर्व सेवा विषयक बाबी तसेच प्रशासकीय व्यवस्थापकीय आणि धोरणात्मक बाबी.
|
5. |
आयुर्वेद-1 |
अवर सचिव/ कक्ष अधिकारी |
- खाजगी आयुर्वेदीक महाविद्यालये व रुग्णालये तसेच खाजगी होमिओपॅथी रुग्णालय येथील नवीन योजना, राज्य व केंद्र पुरस्कृत योजना.
- खाजगी आयुर्वेदीक महाविद्यालये व रुग्णालये तसेच खाजगी होमिओपॅथी रुग्णालय येथील पदनिर्मिती व पदांसंबंधीचे अनुषंगिक सर्व विषय.
- खाजगी आयुर्वेदीक महाविद्यालये व रुग्णालये तसेच खाजगी होमिओपॅथी रुग्णालय/ संस्था यांचेशी संबंधित सर्व सेवा विषयक बाबी व धोरणात्मक बाबी, अनुदान मंजूर करण्याचे प्रस्ताव.
- खाजगी व अनुदानीत महाविद्यालयांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या, आयुर्वेद प्रचार व संशोधन.
|
6. |
अधिनियम |
अवर सचिव/ कक्ष अधिकारी |
- विभागाशी संबंधित कायदे, अधिनियम नियमावली, उपविधी तयार करणे व त्यात दुरुस्त्या करणे व त्यांची अंमलबजावणी करणे.
- विविध परिषदांच्या आस्थापना व इतर बाबी.
|
7. |
परिचर्या |
अवर सचिव/ कक्ष अधिकारी |
वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभागातंर्गत शुश्रूषा क्षेत्रातील सर्व गट अ, ब आणि क संवर्गातील परिचर्या अधिकारी/ कर्मचारी यांच्या सर्व सेवा विषयक बाबी (उदा. सेवा प्रवेश नियम नियुक्त्या, पदोन्नत्या, बदल्या, ज्येष्ठता याद्या, गोपनीय अहवाल, पुनर्विलोकन व विभागीय चौकशी इत्यादी.) |
8. |
शिक्षण-1 |
अवर सचिव/ कक्ष अधिकारी |
- पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना तसेच अशा अभ्यासक्रमांच्या नवीन महाविद्यालयांना/ संस्थांना परवानगी/मान्यता देणे, तसेच प्रवेश मर्यादा ठरविणेबाबत.
- खाजगी महाविद्यालयांवर नियंत्रण ठेवणे, अनुदान मंजूर.
- आरोग्य विज्ञान विद्यापीठांशी संबंधित सर्व बाबी.
- खाजगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या व अन्य कर्मचाऱ्यांच्या तक्रारी/ मागण्यांबाबत.
|
9. |
शिक्षण-1 |
अवर सचिव/ कक्ष अधिकारी |
- वैद्यकीय, दंत, निम वैद्यकीय आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी अभ्यासक्रमांबाबत उपस्थित होणाऱ्या खालील विषयांशी संबंधित सर्व बाबी.
- प्रवेश नियमांशी संबंधित सर्व बाबी. (उदा. प्रवेश नियम तयार करणे. प्रवेश प्रक्रिया राबविणे)
- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बदल्याबाबत.
|
10. |
प्रशासन-1 |
अवर सचिव/ कक्ष अधिकारी |
- शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालये/ रुग्णालये यांचे करिता राज्य स्तरावरील यंत्रसामुग्री खरेदी व दुरुस्ती संबंधिच्या सर्व बाबी.
- शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालये व रुग्णालयांशी संबंधित नवीन योजनाबाबतचे प्रस्ताव.
- औषध खरेदी पध्दती व दरकरार निश्चित करणे.
|
11. |
प्रशासन-2 |
अवर सचिव/ कक्ष अधिकारी |
- शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालये/ रुग्णालयातील व्यवस्थापन, प्रशासन व धोरणात्मक बाबी तसेच विविध प्रकारच्या गैरव्यवहाराविषयक प्रकरणाची प्राथमिक चौकशी.
- स्थानिक खरेदी किंवा विभाग प्रमुखांनी स्वाधीकारे केलेल्या खरेदीबाबत आलेल्या तक्रारी वा लेखा आक्षेप.
- रुग्णालय शुल्क वाढविणे, देणग्या स्वीकारणे, रुग्णालयाचा दर्जा सुधारणे इ. विषयक प्रकरणे.
- सार्वजनिक आरोग्य सेवा व वैद्यकीय शिक्षण या दोन्ही विभागाच्या सामाईक कार्यक्रमावर (उदा. पोलिओ, मलेरिया उच्चाटन, एड्स इ.) कार्यवाही करणे.
- मानसिक आरोग्य संस्था, पुणे या संस्थेशी संबंधित सर्व बाबी.
|
12. |
औषधे-1 |
अवर सचिव/ कक्ष अधिकारी |
- हाफकिन प्रशिक्षण संशोधन व चाचणी संस्था
- हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ यांचेशी संबंधित सर्व बाबी.
- आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांच्या नियंत्रणाखालील सर्व संवर्गातील सेवाविषयक बाबी.
|
13. |
औषधे-2 |
अवर सचिव/ कक्ष अधिकारी |
आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाच्या प्रशाकीय बाबी, अपीले, याचिका, बांधकामे इत्यादी. |
14. |
दक्षता |
अवर सचिव/ कक्ष अधिकारी |
- शासकीय महाविद्यालये व रुग्णालये यांची तपासणी करणे, निरीक्षण अहवाल तयार करुन तो संबंधित कार्यासनांना पाठविणे व त्यावर कार्यवाही होईल या दृष्टीने पाठपुरावा करणे.
- लोक लेखासमिती, अंदाजसमिती व भारताचे लेखानियंत्रण इत्यादी अहवालातील लेखा आक्षेप व इतर लेखा विषयक बाबींचा पाठपुरावा व समन्वय साधणे.
- विभागातील शासकीय/ अशासकीय सर्व लेख्यांच्या नोंदी ठेवणे.
- खर्चाचा ताळमेळ घालणे.
|
15. |
समन्वय |
अवर सचिव/ कक्ष अधिकारी |
- विभागात माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 नुसार प्राप्त होणाऱ्या अर्जांचे संकलन करणे, त्याची नोंदवही अद्यावत ठेवणे.
- अन्य मंत्रालयीन विभागांना पाठवावयाच्या माहितीचे संकलन.
- विधीमंडळ कामकाजाचे समन्वय.
- विभागाशी संबंधित संकीर्ण स्वरुपाच्या बाबी.
|
16. |
अलेप |
अवर सचिव/ कक्ष अधिकारी |
वार्षिक अंदाज पत्रक, सुधारित अंदाज पत्रक, नियोजन विषयक कामकाज, कार्यक्रम अंदाज पत्रक, लोकलेखा समिती, अंदाज समिती व भारताचे लेखानियंत्रक इ. अहवालातील लेखा आक्षेप व इतर लेखा विषयक बाबी, अर्थसंकल्प विषयाशी निगडित अन्य सर्व बाबी. |
17. |
वैसेवा-1 |
अवर सचिव/ कक्ष अधिकारी |
- वैद्यकीय शिक्षण व संशोधन, संचालनालय व या संचालनालयाच्या अधिपत्याखालील–
- गट ‘अ’ संवर्गातील संचालक व सह-संचालक, अधिष्ठाता, प्राध्यापक, मुख्य प्रशासकीय अधिकारी इ. अधिकाऱ्यांच्या सेवा विषयक सर्व बाबी.
ब) गट ‘ब’ मधील प्रशासकीय अधिकारी या संवर्गाच्या सेवाविषयक सर्व बाबी (उदा. सेवाप्रवेश नियम, नियुक्त्या, पदोन्नत्या, बदल्या, ज्येष्ठता याद्या, गोपनीय अहवाल, पुनर्विलोकन, विभागीय चौकशी इ.) क) शासकीय वैद्यकीय रुग्णालय, यांचेसाठी नवीन पदनिर्मिती व शासकीय वैद्यकीय रुग्णालय यांचेसाठी निर्माण केलेल्या पदांशी निगडित अन्य सर्व बाबी (पदांना मुदतवाढ देण्यासह) |
18. |
वैसेवा-2 |
अवर सचिव/ कक्ष अधिकारी |
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गट ‘अ’ मधील सहयोगी प्राध्यापक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्व सेवाविषयक बाबी (उदा. सेवाप्रवेश नियम, नियुक्त्या, पदोन्नत्या, बदल्या, ज्येष्ठता याद्या, गोपनीय अहवाल, पुनर्विलोकन, विभागीय चौकशी इ.)
- मानसेवी प्राध्यापकांच्या सेवा विषयक बाबी.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदांची श्रेणी, अवनती, श्रेणी उन्नत व वेतन पुर्नरचना.
|
19. |
वैसेवा-3 |
अवर सचिव/ कक्ष अधिकारी |
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गट ‘ब’ मधील संवर्गातील प्रशासकीय अधिकारी वगळता अन्य अधिकाऱ्यांच्या सर्व सेवाविषयक बाबी.
- रुग्णालयीन अभ्यागत मंडळे व रुग्णालय सल्लागार समित्या इ. नियुक्त्या करणे व त्यांच्या सूचना व अहवालांवर कार्यवाही करणे.
|
20. |
वैसेवा-4 |
अवर सचिव/ कक्ष अधिकारी |
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गट ‘क’ आणि ‘ड’ मधील संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सर्व सेवाविषयक बाबी. (उदा. सेवाप्रवेश नियम, नियुक्त्या, पदोन्नत्या, बदल्या, ज्येष्ठता याद्या, गोपनीय अहवाल, पुनर्विलोकन, विभागीय चौकशी इ.)
- शासकीय दंत महाविद्यालये व रुग्णालयातील सर्व संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा विषयक बाबी.
|
21. |
विधि कक्ष |
सह/उस/अ स. |
विभागातील सर्व विधि कामकाजाविषयक बाबी. |