उद्दिष्टय आणि ध्येय

उद्दिष्टय

वैद्यकीय क्षेत्रातील चिकित्सालयीन (medical) व अचिकित्सालयीन (paramedical) विषयातील निर्धारित केलेल्या मानकानुसार तसेच सातत्याने वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या बदलानुसार वैद्यकीय क्षेत्राचे संवर्धन व विकास करण्यावर भर देणे. तसेच जीवरक्षक औषधे वाजवी दरात उपलब्ध करुन देणे. याशिवाय अन्न व औषध प्रशासना संदर्भात निर्धारित केलेल्या मानकांची पूर्तता करणे.

ध्येय

राज्यातील सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत आधुनिक वैद्यकीय सेवा, अद्यावत वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, तज्ञ डॉक्टर, वैद्यकीय सेवेशी निगडित समांतर वैद्यकीय बळ (Para Medical Force) निर्माण करणे, अत्याधुनिक परिणामकारक व सुरक्षित जीवन रक्षक (Life Saving Drugs) औषधे उपलब्ध करुन जनतेच्या आरोग्यात व पर्यायाने जीवनमान दर्जा उंचावणे इत्यादी बाबींची सन 2020 पर्यंत पूर्तता करणे.